मधुर अनुभव

कोपऱ्यात असते मी तशी
म्हणजे असत ना असं
presentable
पुढे

पाहुणे येतात तर 

मागच्या बाजूला येतच नाहीत ना!
जेवढं सुंदर सुंदर तेवढं

समोर

दुर्लक्षित बाजूला आम्ही

मी म्हणजे कशी ठेंगणी
थोडी लठ्ठ
कोणीच बघत नाही म्हणून
कदाचित काटेरी झालेली

ऐसपैस वाढलेली 

पसारा सगळा

माझ्याच जगात!!!

एकदा माझ्या जवळ कोणी आलं

एकदम मधुर अनुभव

अरे हे काहीतरी वेगळं य

नेहमीच्या पेक्षा निराळे

मधुर 
एकदम तरतरी आली

हम्म्म

आज जे काही मिळालं ते छान होत

सर्वांग कुतूहलाने थरथरले


 बाजूला कोणीतरी  आलंय

मालकाने कार्यालय बनवलंय घरामागे
नुसती पडीक 
काहीतरी उपयोग म्हनून

इमारत बांधतांना मागच्या बाजूची रोपं जाणार होती

ती कशीबशी तगवली होती..



कार्यलयात कार्यक्रम होता
तिथल्या एकाने चहा ओतला होता 

कोरफडीत
चहा प्यायला की तरतरी येतेचं ना!


Comments

Popular Posts