गणित
दैनंदिन जीवनातील व्यवहारात असणारे गणित
गणित दिवस
आज वाचनात आल गणित दिवस आहे आज आणि छातीत कळ आली. ५०% घेऊन जर जेमतेम पास झालो गणितात आणि पुन्हा वाट्याला गेलो नाही . तर दुसर काय होणार?
आता मुलाला साधी गणित शिकवतांना सुद्धा चार वेळा पुन्हा एकदा तपासून गणित टाकतो!
पण खरच माझ्या आयुष्यातून गणित गेल का? टूथपेस्ट किती लागेल , टूथब्रश किती वेळा तोंडात एका बाजूला फिरवायचा , दोन दाढेतून फिरवायला काय कोण बनवावा लागेल ह्यात सुद्धा गणितच आहे!
अंघोळीला लागणार पाणी, जेंव्हा दुष्काळ होता तेंव्हा आम्ही हिशेब केला होता एका मग्यात शरीराच किती क्षेत्रफळ धुवून होत . दुष्काळ असेल तर एका साधारण आकाराच्या बादलीत लांब केस सुद्धा धुवून होतात. नसेल तर २ बादल्या पाणी लागत.
चहा च आधन ठेवतांना किती माणस, कोण अर्धा कप घेणार कोण दीड कप त्या हिशेबाने पाणी आणि दुध ठरवतो
विचार केला तर लक्षात आल जी क्ष य आणि त्यांचे कंस ह्याची रोजच्या व्यवहारात काय गरज वाटत होत , तेच तर आपण करतोय
उदाहरणार्थ क्ष माणस अर्धा कप घेणारे चहा य माणस पूर्ण कप घेणार चहा तर समीकरण असत ३(क्ष )+ ४ (य) =
दीड + ४= साडे पाच कप चहा
गम्मतच वाटली मला आणि अजून काय काय गणित आपण वापरतो ? ह्याचा शोध मी घेऊ लागले
साध बाजाराला कोणती पिशवी न्यायची
जर आपल्याला १० वस्तू आणायच्या आहेत , एका पिशवीत समान आकाराच्या ३ वस्तू मावतात तर आपण काय करतो ?
वस्तूंचे आकार भागिले पिशव्या (३ वस्तू प्रत्येकी) / १० वस्तू अस गणित मांडून ठरवतो कि उत्तर ३.३३ आलाय म्हणजे चार पिशव्या न्याव्या लागतील .
ते व्याव्स्थापन वाले वाळू मोठे खडे पाणी वगैरे उदाहरण देतात, भाजी आणतांना आपण असच तर आणतो
आधी बटाटे भोपळा वगैरे , मग त्यावर टमाटे, वांगी , आणि शेवटी मिरच्या डोक्यावर कोथिंबीर
गाण शिकायला जा नवीन तान आलाप आपण मात्रेत बसवतो
नवीन रचना करतांना तानेचा आकार आलापी मात्रेत बसवायला सुरांची बेरीज वजाबाकी करतो
पोळ्यांचा सुद्धा हिशेब आहे. १ फुलकी पोळी व्हायला ३० सेकंद लागतात. साधारण ४० एक सेकंद धरले तर २० पोळ्या व्हायला २ १६ ते २० मिनिट्स लागतात. आपण जी व्यवस्थापन करतो
आधी कुकर लावायचा तो पर्यंत भाजी चिरायची , कोशिंबीर तयारी करायची, कणिक भिजवायची, एकीकडे भाजी फोडणीला टाकायची दुसरी कडे पोळ्या करायच्या. तोपर्यंत कुकर शिट्टी पडते, वरण करायचं कोशिंबीर ढवळायची
हे सगळे काळ काम वेगाची गणितच झाली!
पेंट करायला केवढ चित्र आहे , रंग कोणते किती लागतील ह्याचा हिशेब सुद्धा करावा लागतो
गेम खेळतांना वेगवेगळे संघ हाच विचार करीत असतात .
जसं एक विश्व कप सामन्यांमध्ये ग्रुप अ ब क ड असतील तर प्रयेक संघ आपली शक्ती वाचवायला ठरवतात कि एकदा क्वार्टर फायनल मध्ये जागा निश्तित झाली कि हारलो तरी चालेल. किंवा एखाद्या संघाला मागे ठेवायला मुद्दाम हरणे. जस चार संघ असतील अ ब क ड , ब ला ड शी लढायचं नसेल तर मुद्दाम हरणे जेणेकरून मनाजोगता संघ मिळेल.
गणित अजून कुठे आहे
श्वासापासून सगळी कडे , श्वास आणि घासाच गणित जमल नाही तर ठसका बसतो अगदी जीवाशी गाठ येते.
पायाथोगोरस चा सिद्धांत आपण शिडी लावतांना, चढ चढतांना वापरतो. पातेल्याच्या हिशेबाने डाव निवडणे हे सुद्धा ह्याच सिद्धांताच्या आधाराने! जास्त घसरण असेल तर आपण आपल्या पाठीचा कोण बदलतो, खूप उतार असेल तर तिरपे उतरतो. नदी पोहोणारे जिथे पोहोचायचं असेल त्याच्या थोड वरच्या धारेला पाण्यात उतरतात म्हणजे बरोबर कोण होऊन ठरलेल्या ठिकाणी ते पोहोचतात.
आपल्याला असे काही प्रश्न असायचे बघा २१६ अशी बेरीज येणारे ३ सलग आकडे कोणते?
प्रत्यक्षात बघा कसा उपयोग होतो आपण पाच जण गेलो चित्रपटबघायला सगळे मिळून ५५० रुपये लागले तिकिटाला तर प्रत्येकाचा वाटा किती ?
स्वयपाक करतांना तर हर घडी गणित आहे. मापटी मोजून घेतांना , औंस च ग्राम मध्ये ग्राम च वाटी चमचा च्या हिशेबात बदल करतांना उपयोग होतो. एक वाटीच माप असेल तीन चतुर्थांश वगैरे असेळ तर त्याच अजून मोठ्या मापात बदल करणे. हे सगळ रेशो, समांतर गणित , काळ काम वेगाची गणित तिथे कामी येतात
पाकावर आणण्यासाठी सुद्धा उर्जा, पदार्थाचा प्रकार , वेळ सगळी गणित पक्की असतात.
तुम्हाला कपडे शिवातांना सुद्धा माप कामी येतात बाहीच्या ३ इंच, कंबरेच्या दीड पट वगैरे ,
क्रोशा नि विणतांना, दोन सुयांवर विणतांना प्रत्येक खांब आणि साखळी मोजावी लागते, डिझाईन च्या हिशेबाने रंग केंव्हा बदलायचा , इंचातल्या मापात किती साखळ्या मावतात , त्यात अजून भूमिती म्हणजे साखळीचा खांबांचा आकार सारखा असावा लागतो. भरतकाम करतांना सुद्धा हे भान बाळगाव लागत. सुईनि शिव्तांना किती जोर लावायचा जेणेकरून सुई फक्त कापड पार करेल आपल बोट नाही, ह्यात भौतिकशास्त्र ची गणित आली. लागणारा जोर, वेळ , कायनेटिक static उर्जा आणि त्याची गणित.
तर अस हे गणित पुराण, फेसबुक वर ब्लोग वर टाकतांना पण तर शब्दांच गणित बघावंच लागेल.
तर अश्या गणित दिवसाच्या मोजक्या शुभेच्छा!!!!
Comments
Post a Comment